Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

रब्बी पिक विमा न्यायसाठी शेतकरी संजय वाकळे यांचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना साकडे

संग्रामपुर [ प्रतिनिधी ]- तालुक्यातील टाकळी पंच येथील शेतकरी संजय रामचंद्र वाकळे पाटील यांनी 2020 मध्ये रब्बी पिकाचा हरभरा पीकविमा काढला होता त्याचे पिक विमा भरल्याचे पावती क्र 0402272000304146742 आहे.

हे पण वाचा – आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र live

ढगाळ वातावरण व त्यात अळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकावर महागडे रासायनीक औषध फवारणी केली परंतु अवकाळी पावसा मुळे त्यांचे खूप नुकसान झाल्याने शेतकरी संजय वाकळे यांनी क्रॉप इन्शुरन्स ऍपच्या माध्यमातुन कंपनीकडे ऑन लाईन ऑफ लाईन तक्रार केली होती संबंधीत शेतकरीच्या तक्रारी वरुन कंपनीचे प्रतिनिधी यांनी शेतकरीच्या शेतात भेट देऊन पाहणी केली .

SANJAY WAKALE

शेतातील घटना स्थळी पिकाचा पंचनामा सुद्धा केला होता परंतु अदयापही संबंधीत शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे संबंधीत शेतकरीने कृषिमंत्री दादा भुसे यांना पिक विमा मिळवुन देण्यासाठी साकळे घातले निवेदन दिले दुरध्वनी चर्चा केली असता पिक विमा संदर्भात आपण केलेल्या तक्रारीची चौकशी करुन न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन कृषि मंत्री भुसे यांनी संबंधीत शेतकरी यांना दिल्याने पिक विम्या नुकसान भरपाईची आशा पल्लवी झाली केंद्रीय कृषी यांना मेल सुद्धा केलेला आहे परंतु मला अद्याप पर्यंत शेतकरीने ऑन लाईन तक्रार केली मात्र पिक विमा कंपनी व केंद्रीय कृषीमंत्री यांच्या कडून दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकरी यांनी केला.


इतर लगतच्या जिल्यात ज्या शेतकरी लोकांनी विमा कंपनी कडे तक्रारी केल्या त्यांना त्या कंपनीने विना विलंब दखल घेवुन २४ तासात कार्यवाही करण्याचे आश्वासण दिले परंतु रिलायन्स कंपनी हे शेतकऱ्यांना कुठलीही मदत करत नाही तक्रारीसाठी दिलेला टोल फ्री नंबर नेहमी बंद असल्याने पिक विमा कंपनीला आदेश देवुन शेतकऱ्यांना पिक विमा मिळवुन द्यावा अशी मांगणी कृषि मंत्री यांच्याकडे टाकळी पंच येथील शेतकरी संजय वाकळे यांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.