सुनगांव प्रतिनिधी :- सुनगांव येथील वार्ड क्रमांक एक मधील मोठ्या नालीवरील सुस्थितीत असलेला धापा गेल्या दोन महिन्यापासून सुनगाव ग्रामपंचायतने काढून टाकला तेव्हापासून दिनांक 18 जुलै पर्यंत सुद्धा सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाने धापा टाकलेला नाही. आज दिनांक 18 जुलैला संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सुनगाव येथील च रामदास वसुले हे आपल्या मोटर सायकल ने येत होते. त्यांना नाली वरील धापा नसल्याचे निदर्शनास आले व त्यांनी दुरूनच आपल्या गाडीचे ब्रेक लावले परंतु तरीही मोटरसायकल तुटलेल्या नालीमध्ये जाऊन पडली
त्यामुळे रामदास वसुले यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. रामदास वसुले हे आपल्या मोटरसायकल सह नालीमध्ये पडलेले तेथील नागरिकांना दिसताच वसंता मगर,गणेश भड,कुसुम भगत हे धावतच त्या ठिकाणी गेले व त्यांनी रामदास वसुले यांना नालीच्या बाहेर काढले व त्यांच्या गाडीला सुद्धा बाहेर काढले.
अशीच घटना दिनांक आठ जुलै रोजी वसंता मगर यांचा नातू खेळता खेळता तुटलेल्या नाली मध्ये पडला होता. तेव्हा वसंता मगर आणि गणेश भड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तसेच वार्ड क्रमांक एकच्या सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना धापा दुरुस्तीची विनंती केली तरीही आज पर्यंत धापा दुरुस्त झाला नाही. त्यातच ही मोठी दुर्घटना होता होता तळली. या दुर्घटनेमुळे येथील नागरिकांनी आठ दिवसाच्या आत ग्रामपंचायत ने नाली वरील सिमेंट धापा न टाकल्यास येथील नागरिक पूर्ण नाली मातीने भरुन टाकतील असा इशाराच ग्रामपंचायतीला दिला आहे.