संग्रामपूर न्यायालयीन ईमारत व न्यायधीश निवास्थान करिता जागेला मंजुरात आ.डाॕ.संजय कुटे यांचे प्रयत्नांना यश.
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयीन ईमारती करीता जागा मिळावी याकरीता संग्रामपूर तालुका वकील संघाचे वतीने जिल्हा सत्र न्यायाधिश बुलडाणा यांचे कडे प्रस्ताव सादर केला होता.याकरीता आमदार डाॕ.संजय कुटे यांनी पुढाकार घेवून सतत पाठपुरावा केला सदर जागेचा प्रश्न निकाली काढावा यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केले.
अखेर आ डॉ कुटे यांच्या जातीने लक्ष देऊन सतत प्रयत्नांना व संग्रामपूर वकील संघाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि संग्रामपूर येथील न्यायालय इमारत व न्यायाधिश निवासस्थान बांधण्याकरीता तहसिल कार्यालयाचेच बाजूला असलेल्या सरकारी जमिनीतील 0.७६ हे.आर जमीन जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दि.१२/जुलै/२०२१ रोजी आदेशानुसार मंजूर करुन ताब्यात घेण्याचा आदेशही दिला संग्रामपूर येथे सन २००८ मध्ये दिवाणी व फौजदारी न्यायलयाची स्थापना झाली.न्यालयाच्या स्थापने पासून न्यायालयाचे कामकाज हे भाडे तत्वावर खाजगी मालकाच्या इमारतीत सुरु असून सदर इमारतीत पक्षकार व वकीलांकरीता कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने संग्रामपूर तालुका वकील संघाच्या वतीने दि.१/ फेब्रुवारी /२०१७ रोजी गट नं.१६० मधील २ एकर जमीन संपादनासाठी जिल्हा न्याधिश यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.परंतु तहसिलदार कार्यालयाने कोणत्याही प्रकारे कारवाई केली नसल्यामुळे सदर प्रकार आमदार डाॕ.संजय कुटे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वकील संघाच्या सर्व सदस्यांना स्वतः बोलावून सदर जागेची पाहणी केली.व तत्कालीन नायब तहसिलदार यांना मोक्यावर बोलावुन तात्काळ सदर न्यायालयाचा जागेचा प्रश्न निकाली काढण्याच्या सुचना दिल्या .
त्यानुसार तहसिलदार संग्रामपूर यांचे राजस्व प्रकरण क्र.एल.एन.डी /१२/संग्रामपूर /१/ २०१८-१९ नुसार पंजीबध्द करण्यात आले होते.सदर जागेसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी हरकती मागविल्या असता तीन शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या.त्याची चौकशी होवून सदर हरकत न्यायसंगत नसल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजुर खारीज करण्यात आला .आणि सदर जमीनीबाबत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन शासनाच्या नियम व अटीस अधीन राहून जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा आदेश क्र./रा.प्र.क्र. एल.एन.डी./१२/संग्रामपूर /१९/- दि.१२/जुलै /२०२१ रोजी आदेश पारित करुन मौजे संग्रामपूर येथील गट नं. १६० मधील ४ हेक्टर पैकी ०.७६ हे.आर.जमीन जिल्हा व सत्र न्यायाधिश बुलडाणा यांच्या मार्फत मा.प्रधान सचिव व न्याय विभाग मुंबई यांना संग्रामपूर येथील न्यायालयीन इमारत व न्यायाधिश निवासस्थान बांधण्याकरीता मंजूर करण्यात आली आहे.तसेच सदर जमीनीची भूमी अभिलेख संग्रामपूर यांचे कडील मोजणी नकाशा प्रमाणे जागेसाठी ताबा घेण्याची कार्यवाही करावी असेही आदेशात नमुद केले आहे. संग्रामपुर न्यायलय नियोजीत जागेत सुविधायुक्त इमारत लवकरच होणार आहे