बुलडाणा, दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3257 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3244 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 614 तर रॅपिड टेस्टमधील 2630 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3244 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : दिवठाणा 1, नांदुरा शहर : 2, जळगांव जामोद शहर : 1, सिं. राजा तालुका : सावखेड तेजन 1, जळगांव जामोद तालुका : वडगांव पाटण 1, आसलगांव 1, बुलडाणा शहर : 2, दे. राजा तालुका : मेंडगांव 1, चिखली शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 71 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 594090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86269 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86269 आहे.
आज रोजी 1688 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 594090 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87051 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86269 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 118 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.