जळगाव जामोद गजानन सोनटक्के – तालुक्यातील सूनगाव येथील गोडाळा लघु प्रकल्प च्या परिसराची वनसैनिक पर्यावरण मित्रांनी सफाई करून तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.सविस्तर वृत्त असे की, सूनगाव येथील वनसैनिक पर्यावरण मित्र हा तरुण मुलांचा गट सध्या पर्यावरणप्रति खूपच उत्साही व सकारात्मक पाऊले उचलत असून सूनगाव येथे गोरक्षनाथ महाराज मंदिर परिसराजवळ 1001 झाडे लावणे व संगोपन करणे ह्या उपक्रमात व्यस्त आहेत,यातील पहिल्या टप्प्यात श्रमदानातून खड्डे खोदणे हा भाग पूर्ण करून पावसानंतर वृक्षरोपन होणार आहे, त्यामुळे पावसाने दडी मारल्याने जो रिकामा वेळ उरला होता तो सत्कारणी लावत या तरुण वनसैनिक मित्रांनी गोडाळा धरण परीसर सफाई करण्याचे ठरवले.
आता कोणत्याही वेळी पाऊस आल्यावर या धरणात भिंगारा हुन निघून पद्मावती नदी पाणी आणून सोडणार आहे, त्यामुळे सध्या जो प्लास्टिक व इतर कचरा जमलेला आहे त्याने नवीन जलसाठा कचरा सडल्याने दूषित होईल , तसेच परिसरात पडलेल्या काचा येणाऱ्या पर्यटक व स्थानिक नागरिकांना इजा पोहचवू शकते,ह्यामुळे ह्या मित्रांनी रविवार दि 4 ला एकत्र येत संध्याकाळी 4 ते 6 या 2 तासात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला यासाठी सूनगाव ग्रामपंचायत कचरा गोळा करण्यासाठी आपले वाहन व एक कर्मचारी उपलब्ध करून दिला होता.
कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टिक व दारूच्या फुटलेल्या रिकाम्या बाटल्या हे जास्त आढळून आले.
ह्या मुलांना श्रमदान करताना पाहून स्थानिक आदिवासी नागरिक याना स्वछतेचा सकारात्मक संदेश गेला असून या बहुतांश विद्यार्थी असलेल्या तरुण मित्रांचे हे कार्य सर्व स्तरातून कौतूक केल्या जात आहे.सातपुडा,तालुक्यातील पर्यावरण ,नैसर्गिक सम्पत्ती व त्याचा उंबरदेव ते कुवरदेव हा भाग यावर हे मित्र पुढेही वेगवेगळे उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच गोरक्षनाथ मंदिर परिसर जवळच्या वृक्षरोपन व संगोपन साठी श्रमदानातून सुरू असलेल्या देवराई उपक्रमास श्रमदानास व भेट देण्यास आवाहन करण्यात आले आहे
या उपक्रमात निवृत्ती वंडाळे ,महेंद्र केदार ,गणेश फुसे,सागर भोपळे,ग्रा प कर्मचारी लखन,निशात धुळे,योगेश गवई,रोहन गव्हाळे,वैभव हागे
,मंगेश दातीर,वैभव नानग्दे,इत्यादी वनसैनिकांनी भाग घेतला