स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द केलेले ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे तसेच ओबीसिंची जातीनिहाय जनगणना करन्यात यावी
जळगांव जामोद गजानन सोनटक्के :-दिनांक 5 जुलै 2021रोजी बारी समाज जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत उपरोक्त मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.संपूर्ण भारतात बारी समाजाचे कमी अधिक प्रमाणात वास्तव्य असून महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य बारी समाज हा शेती व मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. बारी समाजाचे उत्पन्न अत्यल्प आहे.बारी समाज आर्थिकदृष्ट्या,शैक्षणिकदृष्टया,सामजिकदृष्टया,व राजकीय दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे.बारी समाजाचे देशात व राज्यात राजकीय अस्तित्व नगण्य आहे,.थोडयाफार प्रमाणात बारी समाज ओबीसी प्रवर्गमध्ये येत असल्याने ओबीसी आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकतो.परंतु ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यास त्यापासून बारी समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल.
तरी कृपया स्थानिक स्वराज्य संस्थामधिल रद्द केलेले ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इंपीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करान्यात यावा.अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या प्रतिलिपी मा ना श्री अजित पवार साहेब,उपमुख्यमंत्री,मा ना श्री विजय वटेड्डीवार साहेब मंत्री ओबीसी विभाग, मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते विधानसभा, मा श्री नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष भा रॉ काँग्रेस, मा श्री चंद्रकांत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष भा ज पा, मा ना श्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब पालकमंत्री बुलढाणा,मा श्री प्रतापराव जाधव खासदार बुलढाणा, मा श्री संजय कुटे साहेब आमदार जळगांव जामोद, मा श्री बबनराव तायवाडे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ, मा श्री रमेशचंद्र घोलप साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ, मा जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदनाच्या प्रतिलिपी देण्यात येतील असे आयोजकांनी कळविले.
या निवेदनावर श्रीकृष्णभाऊ केदार, सुभाषभाऊ हागे, पांडुरंगभाऊ हागे,श्यामभाऊ डाबरे, सखारामभाऊ ताडे, अर्जुनभाऊ घोलप, रमेशभाऊ ताडे, अशोकभाऊ काळपांडे, सुरेशभाऊ हागे,महादेवभाऊ धुर्डे,गुणवंतभाऊ कपले,बाळूभाऊ धुळे,डॉ गणेश दातीर, रमेशभाऊ कोथळकर,महेंद्रभाऊ बोडखे,पुंडलिकभाऊ पाटील,संतोषभाऊ टाकळकर,रामेश्वरभाऊ केदार, शत्रुघ्नभाऊ मिरगे, रमेशभाऊ बानाईत,राजुभाऊ हिस्सल,पांडुरंगभाऊ म्हस्के,मोहनभाऊ वंडाळे,गोपालभाऊ कोथळकर, श्रीकृष्णभाऊ गाडगे,भास्करभाऊ पाटिल, विजुभाऊ गाडगे,बळीरामभाऊ धुळे विलासभाऊ हागे, रवींद्रभाऊ बोडखे,अर्जुनभाऊ रौदळे,बाळूभाऊ पाटिल, संतोषभाऊ हागे, मोहनभाऊ सांगळे, समाधानभाऊ नानकदे,श्रीरामभाऊ मिसाळ, शंकरभाऊ म्हस्के, सुरेशभाऊ काळपांडे, ज्ञानदेवभाऊ काळपांडे, गोपालभाऊ ढगे, सोमेशभाऊ लाड, अनीलभाऊ ढगे,वसंतभाऊ अंबडकार,राजुभाऊ मिसाळ व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.