बुलडाणा, दि.2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2258 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2169 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 89 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 440 तर रॅपिड टेस्टमधील 1729 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2169 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 7, शेगांव तालुका : येऊलखेड 2, आडसूळ 1, दे. राजा शहर : 4, दे. राजा तालुका : पिंप्री आंधळे 1, चिंचखेड 1, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 2, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : किन्ही महादेव 1,लोखंडा 1, गोंधनापूर 1, अंत्रज 1, सुटाळा 2, नांदुरा शहर : 1, जळगांव जामोद तालुका : सावरगांव 2, वडगांव गड 1, खेर्डा बु 1, जामोद 1, बोराळा बु 2, सुनगांव 1, मांडवा 1, माहुली 4, सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : कंडारी 1, चिंचोली 1, राहेरी 1, रूमणा 1, कि. राजा 17, चांगेफळ 1, दिग्रस 1, उमरद 2, निमगांव वायाळ 3, हिवरखेड 3, पि. लेंडी 1, दुसरबीड 4, संग्रामपूर तालुका : भोन 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : भालगांव 1, नायगांव 6 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 89 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 32 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 578526 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86010 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86010 आहे.
आज रोजी 1713 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 578526 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86826 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86010 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 153 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.