गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगाव जामोद पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या चौघांना बुधवार दिनांक 30 जून रोजी अटक करण्यात आली याबाबत जळगाव जामोद पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत आणि बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली की पळशी फाट्यावर विनापरवाना अवैधरित्या दारूची चौघेजण वाहतूक करीत आहेत या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके श्रीकांत जिदमवार श्रीकृष्ण चांदुरकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले विजय सोनोने सचिन गुंजकर यांनी फरशी फाटा येथे सापळा रचला त्या वेळी समोरून येणाऱ्या चार चाकी वाहन आणि मोटर सायकल पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडून 4 बाॅक्स देशी दारू किंमत 13 हजार 440 रुपये विनापरवाना मिळून आली यावेळी पोलिसांनी सागर वासुदेव कोकाटे व 26 राहणार पळशी सुपो अतुल अरुण मानकर वय 30 राहणार पिंपळगाव काळे विवेक प्रल्हाद श्रीनाथ वय 21 वर्षे राहणार शिव शंकर नगर तालुका नांदुरा आणि श्याम कैलास घटे वय पंचवीस वर्ष राहणार पिंपळगाव काळे या चौघांना ताब्यात घेतले यावेळी नगदी 6000 चारशे रुपये चार चाकी वाहन एक मोटर सायकल किंमत 6 लाख 50000 रुपये 4 मोबाइल हँडसेट किंमत 26 हजार रुपये असा एकूण सहा लाख 95 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला चौघा आरोपींना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related Posts