मेहकर रवींद्र सुरूशे. – 28 जूनला झालेल्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेले आहे. या नुकसानीचे पाहणे आज दिनांक 30 जून बुधवार ला लोणी गवळी व परिसरातील शेतजमिनीची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी केली. व शेतकऱ्यांना धीर देत सरकार तुमच्यासोबत आहे मी व खासदार साहेब मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांचे जमिनीचा सर्वे करून यादी तयार करावी. व ही यादी फायनल करण्याअगोदर संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावा. म्हणजे कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना यावेळी रायमुलकर यांनी दिल्या. गटविकास अधिकारी पवार,कृषी अधिकारी काळे, तलाठी मॅडम, कृषीसाह्यक सोळंकी, कृषीसाह्यक मोरे, सरपंच दिनुभाऊ कंकाळ, ग्रामसेवक बंगाळे,काळे,गजानन लहाने,तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिनुभाऊ लहाने, मा सभापती बबनराव लहाने, कॉटन मार्केट बाजार समितीचे संचालक संजय सवडतकर व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
Related Posts