गजानन सोनटक्के जळगाव जा – सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे गेल्या हंगामात पिकाचे नुकसान झाले आहे यंदा दुसरा हंगाम तोंडावर आला तरी मागील वर्षाचा पिक विमा अद्यापही मिळालेला नाही बुलढाणा जिल्ह्यात जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा लागलेली आहे संपूर्ण जिल्ह्यातील चौदाशे1419 गावांमध्ये अंतिम पैसेवारी 50 पैसे च्या आत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु अद्यापही विमा कंपनी यांनी शेतकऱ्यांना विमा दिलेला नाही त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांकडून व काही नेत्यांकडून पीक विमा संदर्भात आंदोलने देखील करण्यात आली परंतु शासनाने याची दखल न घेता कंपन्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही त्यामुळे शासन आणि काही शासनातील मंत्री यांचे विमा कंपनी यांच्याशी धागे-दोरे आहेत असे शेतकऱ्यांना बोलल्या जाते व आता मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी पिक विमा काढला होता व बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मध्ये पीक विमा शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात काढला होता व त्यानुसार पिके आलेच नव्हते व महसूल मंडळा कडून सुद्धा पैसेवारी ही पन्नास टक्क्यांच्या आत आलेली आहे व तसा अहवाल महसूल व कृषी विभाग यांच्याकडून शासन दरबारी मांडलेला आहे परंतु शेतकऱ्यांचा कोणी वाली नसल्यामुळे या कंपन्यांवर सरकारने अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही तरी या हंगामात पिक विमा काढायचा की नाही या संभ्रमात जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी आहेत
Related Posts