सिंदखेड राजा रवींद्र सुरूशे – औरंगाबादेत शस्त्रक्रिया करत असताना एका तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला . हे तरुण डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला . त्यामुळे संपूर्ण औरंगाबादेत हळहळ व्यक्त केली जात आहे . दिग्विजय शिंदे अस या डॉक्टरांचं नाव आहे . ते औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात पॅक्टिस करत होते . ते दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करत होते . मात्र , शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला .
नेमकं घडलं अस की,
डॉ . दिग्विजय शिंदे हे एक फिजिशियन इंटेंसिविस्ट होते , ते मूळचे इटखेडा येथील आहेत . औरंगाबादेतील स्टेशन रोडवरील खाजगी रुग्णालय जीआय वन हॉस्पिटल येथे ते रुग्णाची छोटी झालेली अन्न नलिका मोठी करण्याची शस्त्रक्रिया करत होते . यावेळी त्यांच्यासोबत इतर डॉक्टर देखील उपस्थित होते . शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुर्बिणीतून पाहत असताना डॉ . शिंदे यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.हे लक्षात येताच ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आणि त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला . तात्काळ हृदयविकारतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले परंतू सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ . दिग्विजय शिंदे हे मुळचे सिंदखेडराजा तालुक्यात मौजे ताडशिवणी येतिल डॉ दशरथ तुकाराम शिंदे यांचे धाकटे चिरंजीव होते. त्यांच्या पार्थिवावर आज 27 जून वार रविवार सकाळी अंत्यसंस्कार पार पडले.त्यांच्या अश्या अकाली निधनाने सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .