Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षण साठी भाजपाचे रास्ता रोको आंदोलन

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 26 – भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी तारीख 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये चक्का जाम आंदोलन पुकारले होते त्या आंदोलनाचे तीव्र पडसाद सिंदखेड राजा येथे पडली माजी आमदारतोताराम कायंदे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांच्या नेतृत्वामध्ये तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला विकास आघाडी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा या वेळी देण्यात आल्या व राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आली त्याचा तीव्र निषेध करीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बसस्थानक चौकात तीव्र चक्काजाम आंदोलन करत आले.

obc andolan

याप्रसंगी माजी आमदार तोताराम कायंदे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद भाऊ वाघ भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गजानन घुले भाजपाचे शहराध्यक्ष डॉक्टर कृष्णा काळे भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव खेकाळे भाजपाचे जेष्ठ नेते प्रभाकर ताठे बाळासाहेब केळकर सौ प्रिया केळकर युवराज नागरे आत्माराम शेळके छगन खंदारे यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.