Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

AHRAM SHALA

 बुलडाणा, दि.22 : तालुक्यातील कोलवड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग 6 ते 10 च्या रिक्त जागेसाठी मोफत प्रवेश सुरू झालेले आहेत. सदर शाळा ही शासकीय असून समाज कल्याण विभागा अंतर्गत संचालीत आहे. या शाळेमध्ये मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके यासोबत संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य, डिजीटल ग्रंथालय, डिजीटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, निसर्गरम्य स्वच्छ व सुंदर परिसर आदी सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अनु जाती 80 टक्के, अनु जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के व एसबीसी 2 टक्के याप्रमाणे आरक्षण आहे. तरी इच्छूकांनी त्वरित कार्यालयीन वेळेत शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक नागसेन वाकोडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.