दुसरबीड सिंदखेड राजा प्रतिनिधी – मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर जिल्ह्यातील नामवंत कवी डॉक्टर विशाल इंगोले यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ विशाल इंगोले यांच्या “माझ्या हयातीचा दाखला” या कवितासंग्रहाची साहित्यिक आणि वाचकांनी खास दखल घेतल्याने त्यांना तब्बल 18 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार व विश्वकोश निर्मिती मंडळावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा दुसरबीड येथे आम्ही दुसरबीडकर या मित्र मंडळींच्या वतीने यथोचित सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी विश्वकोष निर्मिती मध्ये डॉ.विशाल इंगोले यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे.
बुलडाणा जिल्हावासीयांकरीता हे एक मोठे भूषण आहे. या बरोबरच ‘माझ्या हयातीचा दाखला’ हा काव्यसंग्रह संबंध राज्यभर गाजत आहे.अनेक दर्जेदार वैचारिक लोक या संग्रहाच्या बाबतीत आपली भूमिका माध्यमातून मांडत आहे.मुख्य म्हणजे डॉ विशाल इंगोले यांचे माध्यमिक शिक्षण हे दुसरबीड येथे झाले अजून येथे त्याचा बराचसा मित्र परिवार आहे.त्यामुळे माहेरचा सत्कार म्हणून ह्यास विशेष असे महत्व प्राप्त होते आहे.या प्रसंगी डाँ इंगोले यांच्या निवडीवर व स्वागतपर गोखले इन्स्टिट्यूट पुणे चे डॉ नरेश बोडखे,लोकजागर परिवाराचे प्रवीण गिते यांनी आपली भूमिका मांडली डॉ विशाल इंगोले यांनी सत्काराला उत्तर दिले.ज्या मातीत वाढलो आज त्याच मातीत माझा होत असलेला सन्मान पाहून मला भरून आले आहे असे भावनिक उदगार त्यांनी या प्रसंगी काढले या कार्यक्रमाचे संचालन व आभार संतोष पुरी यांनी केली या प्रसंगी, माजी सरपंच वैभव देशमुख, इरफान शेख, शहेजाद पठाण, नौशाद शेख, अविनाश चव्हाण, ज्ञानेश्वर तौर, इरशाद शेख, गजानन डाखोरकर,गजानन कुलाल, सुधाकर मुंढे, सचीन घुगे, याकुब शेख, संजय देशमुख ज्ञानेश्वर घायाळ,आदी मित्र परिवार उपस्थित होता..