
जळगांव जा.प्रतिनिधी ( गजानन सोनटक्के ) :- AIMIM च्या वतीने आज दिनांक 18 जुन रोजी जळगांव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती 25% टक्क्यांनी कमी करा या मागणीसाठी देण्यात आले निवेदन.पेट्रोल व डिझेल हे आजच्या परिस्थिती मध्ये जिवनावश्यक वस्तू झाले आहे. केंद्र शासन रुपये ३३ प्रती लिटर पेट्रोल व ३२ रूपये प्रती लिटर डिझेल वर vat आकारत आहे. तसेच राज्य शासन VAT व्हॅटच्या नावावर २५ टक्के प्रती लिटर पेट्रोल व २२ टक्के प्रती लिटर डिझेल वर कर आकारीत आहे. हि वस्तुस्थिती आहे. २५ मार्च २०११ रोजीच्या माहितीनुसार केंद्र शासन व राज्य शासन यांनी आपले टॅक्सेस कमी करून, पेट्रोल व डिझेल यांचे प्रती लिटर टॅक्स कमी करून आकरण्यात आलेल्या किमती मध्ये २५ टक्क्यांनी कपात केली पाहिजे,अशी मागणी AIMIM ने केली आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष समीर अहमद सै शमीमशे गुलाब, शे मेहबूब ,जुबेर भाई ,शे अनिस ,सय्यद हसन ,इत्यादींच्या सह्या आहेत