Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कृषी समृध्दी केंद्र – हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( महाराष्ट्र समृध्दी महामार्ग ) नवनगरामध्ये संपादीत होत असलेल्या क्षेत्रामध्ये नोंदी न करणेबाबत आदेश पारित…

samruddhi

सिंदखेड राजा – बुलढाणा जिल्यातील सिंदखेड राजा व देऊळगावराजा तालुक्यातील कृषी समृध्दी केंद्र – हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( महाराष्ट्र समृध्दी महामार्ग ) नवनगरामध्ये संपादीत होत असलेल्या क्षेत्रामध्ये नोंदी न करणेबाबत आदेश पारित झाले . सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे सावरगाव माळ व देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेग ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग अंतर्गत कृषी समृध्दी केन्द्र निर्माण करण्यात येणार आहे . कृषी समृध्दी केन्द्र या निर्माणाधीन कृषी समृध्दी केंद्राकरीता सदर गावातील संपुर्णे गटाची भुसंपादनाची प्रारंभिक अधिसुचना दिनांक ०१ / ०२ / २०१ ९ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे . त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने संयुक्त मोजणीची कार्यवाही पुर्ण होऊन संयुक्त मोजणी अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले आहे . सदर अहवालाचे अनुषंगाने मोबदला परिगणित करण्याची कार्यवाही सुरू आहे . सदर प्रक्रियेच्या अनुषंगाने ७/१२ मध्ये आता नव्याने क्षेत्र बदल , खातेदाराचे नाव बदल झाल्यास मोबदला परिगणित करण्याची प्रक्रिया क्लिष्ट व गुंतागुतीची होण्याची शक्यता आहे , तसेच अशा प्रकारे बदल झाल्यास संबंधित व्यक्ती मोबदल्या पासुन वंचित राहण्याची शक्यता व संबंधित व्यक्तीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे सदर गावांमध्ये उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी सिंदखेड राजा यांच्या अभिप्राय घेतल्याशिवाय खरेदी विक्री व्यवहार , ७/१२ मध्ये कोणतीही नोंद / फेर रुजु करण्यात येऊ नये .

Leave A Reply

Your email address will not be published.